
दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये एकमत झाल्यानंतर भाजपाने इंडीया आघाडीचा प्रचंड धसका घेतल्याचे उघड झाले आहे. या आघाडीमुळे येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली जाऊ शकते अशी शक्यता आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली.
























































