
येत्या दिवाळीत अख्ख्या मुंबईला लायटिंग करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर आता नवरात्रोत्सवही जोशात साजरा होईल आणि नंतर दिवाळीत तर मुंबईभर दिवे लावू, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही ठाण्यात लायटिंग करतो. तुम्ही मुंबईत तसेच करा, असे आदेश आपण अधिकाऱयांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात सांगितले. मुंबईतील रोषणाईचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून होणार की राज्य सरकारच्या हे मात्र मुख्यमंत्र्यांनी गुलदस्त्यात ठेवले.
































































