या इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत, त्या जपल्या पाहिजेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजभवनमधील दरबार हॉलचे तीन महिन्यांपूर्वी लोकार्पण झाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते क्रांतीकारक गॅलरीचे उद्घाटन झाले आहे. आपण नेहमी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतीकारक यांच्या अनेक गोष्टी ऐकत आलो आहेत. जे स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहेत, त्यासाठी किती जणांनी बलिदान दिले. प्राणांची आहुती दिली. त्याग केला, याची माहिती पुढील पिढीला देणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य आपल्याला आंदण मिळालेले नाही, त्यासाठी आपण संघर्ष केला आहे. त्याची माहिती पुढच्या पिढीला देणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यसैनिक, क्रांतीकारक यांच्याबाबतचे हे संग्रहालय आहे. नागरिकांना याची माहिती मिळण्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे. त्यामुळे क्रांतीकारक गॅलरी हे एक तीर्थस्थळ आहे. मुंबईमधील जलभूषण इमारत आणि राजभवमधील क्रांतीकारक गॅलरीच्या उद्धाघन प्रसंगी ते बोलत होते.

काळ बदलत असला तरी या परिसरातील वास्तू या इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. त्या जपत त्याचे नुतनीकरण करणे गरेजेचे असते. या वास्तूंचे नुतनीकरण करताना याकडे लक्ष देण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्धाघनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळ काढून आल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)