दारूच्या नशेत चिडलेल्या बापाने चिमुरड्याला आपटले, मुलाचा मृत्यू

19
alcohol-new-study-report


सामना प्रतिनिधी । नगर

दारूच्या नशेत घरात झालेल्या भांडणाचा राग पित्याने अवघ्या एका वर्षाच्या चिमुरड्यावर काढत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगरमधील तपोवन रोड परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. चिराग सोहम कुमावत असे त्या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चिराग याचे वडील सोहम कुमावत व आई अर्चना कुमावत हे तपोवन रोड परिसरात राहतात. ते मूळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. नगर शहरात फरशी बसवण्याचे काम करीत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात ते नगरमध्ये वास्तव्य करतात. सोहम कुमावत याला दारूचे व्यसन आहे. गुरुवारी रात्री उशिरा तो दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळेस पत्नी अर्चना हिच्यासोबत त्याचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात त्याने रागाच्या भरात पत्नी व मुलाला मारहाण सुरू केली. मुलाला बऱ्याच वेळा उचलून टाकले. त्यामुळे त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या चिराग याला आईने उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले. मात्र डॉक्टरांनी चिराग याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या