चिनी पुन्हा कुत्रे खाणार! Dog Meat Festival धूमधडाक्यात साजरा करण्याची तयारी

लसीकरण मोहीम जगभरात सुरू झाली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नष्ट झालेला नाहीये. कोरोनाचा उगम हा चीनमधील वुहान इथल्या प्रयोगशाळा असल्याचा सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर चीनमधील मांस बाजाराबाबत अनेकदा बोललं गेलं आहे. चीनमधलं जनजीवन पूर्वपदावर येत असून तिथे यावर्षी कुत्र्यांचे मांस खाण्याचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. युलिन शहरात हा उत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या उत्सवाविरोधात प्राणीप्रेमींनी आवाज उठवला असून त्यावर टीकाही केली आहे. असं असलं तरी कुत्र्याच्या मांसाला चटावलेल्या चिन्यांना त्याचा फरक पडलेला नाहीये. या उत्सवासाठी त्यांनी हजारो कुत्रे कत्तलीसाठी युलिनमध्ये आणायला सुरुवात केली आहे.

ही बातमी वाचलीत का ? – ब्रिटनमध्ये लसीकरणासाठी तरुण 1 किमी रांगेत उभे

युलिन आणि गुआंगक्सी भागात कुत्र्यांच्या कत्तलीला सुरुवात झाली असून तिथल्या कत्तलीचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. प्राणीमित्रांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की कुत्रे घेऊन जाणारे ट्रक सीमेवरच अडवून कुत्र्यांचा जीव वाचवला जात आहे. प्राणीमित्रांनी दावा केला आहे की या सीमेवरून कुत्र्यांची तस्करी अजूनही सुरू असून अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्षच नाहीये.

ही बातमी वाचलीत का ? – अमेरिकेच्या नौदलाने समुद्रात फोडला 18 हजार किलोंचा महाकाय बॉम्ब

सार्वजनिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी कोरोनाच्या उद्रेकानंतर चीन सरकारने घाणेरड्या आणि बेकायदेशीर मांसविक्री करणाऱ्या ठिकाणांवर धडक कारवाई केल्याचा दावा केला होता. तरीही चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध पक्षी आणि प्राणी मारून खाल्ले जात आहेत. चीनमधील प्राणीमित्रांनी कुत्र्यांचा जीव वाचावा यासाठी एक मोहीम सुरू केली असून त्यांनी तिथले आरोग्यमंत्री, कृषीमंत्री आणि युलिनच्या महापौरांना एक निवेदनही दिले आहे.

चीनमधील डॉक्टर पीटर ली यांनी कुत्र्यांचे मांस खाण्याच्या उत्सवाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘कोरोनाचे रुग्ण अजूनही सापडत आहेत, अशा परिस्थितीत उत्सवाच्या नावाखाली कुत्र्याचे मांस खाण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी हॉटेल आणि बाजारात गर्दी होताना दिसत आहे. हे सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे’, असं ली यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये चीनने जंगली जनावरांच्या मांसविक्री आणि सेवनावर तात्पुरती बंदी घातली होती, कारण तेव्हा असं सांगितलं जात होतं की वटवाघुळाचे मांस खाल्ल्याने कोरोनाची लोकांना लागण झाली असून, तिथूनच हा आजार पसरत गेला.

आपली प्रतिक्रिया द्या