
चीनवर दादागिरी केली, चीनवर डोळे वटारले तर आम्ही विदेशी शक्तींचे डोके ठेचून काढू, असा इशारा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. तैवानला चीनमध्ये सामावून घेणे आणि हाँगकाँगमध्ये सामाजिक स्थैर्य निर्माण करणे याला आपले प्राधान्य असल्याचे जिनपिंग म्हणाले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनला शंभर वर्षे झाली. त्यानिमित्त तिआनमेन चौकात राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी भाषण केले. चीनमधील अल्पसंख्याकांचे प्रश्न या मुद्दय़ांवर अमेरिकेसह अनेक देशांकडून चीनवर वारंवार टीका केली जाते. मात्र, जिनपिंग यांनी आपले आडमुठे धोरण स्पष्ट करताना कुठल्याही विदेशी शक्तींच्या दादागिरीला, दबावाला बळी पडणार नाही. कोणी दादागिरीचा प्रयत्न केल्यास 140 कोटी चिनी जनता डोके ठेचेल, असा इशारा दिला.






























































