चिपळूणात 26 लाखांच्या गुटखा पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

चिपळूण शहरातील खाटीक आळी परिसरात मटण मार्केटजवळ असलेल्या नजराणा इमारतीच्या खाली गुटख्याने भरलेल्या दोन गाड्या काही नागरिकांनी पकडून दिल्या.तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

मारुती इको ( एमएच 08 – एन – 7793 ) व आयशर टेम्पो ( एमएच – 07 – एक्स 862 ) काही नागरिकांनी पकडून पोलिसांना खबर दिली .या वाहनांसह पोलिसांनी 26 लाख रुपयांचा गुटखा सापडला असून चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे

गुटखा आणि दोन वाहनांसह सुमारे 26 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी दशरथ बांबळे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दिली. त्यानुसार आरोपी मुश्ताक कच्छी ( रा. चिपळूण), अंकुश केसरकर व संदीप पाटील (दोघेही रा. सावंतवाडी) हे आपल्या ताब्यातील दोन्ही वाहनांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी सुपारी, पान मसाला भरुन वाहने उभी करुन ठेवली होती याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी ही धडक कारवाई केली. हा गुटखा अन्यत्र नेत असल्याची कबुली संबंधित तिघांनो दिली.

शुक्रवारी रात्री उशिरा चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अन्न औषध प्रशासन करतयं काय?

काही दिवसांपूर्वी कालूस्ते व कामथे येथे पोलिसांनी धाड टाकून बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना उध्वस्त केला होता.या दोन्ही ठिकाणी अन्न औषध प्रशासन मार्फत पंचनामा करून कारवाई झाली होती.मात्र या प्रकरणी ठोस कारवाई झाली नसल्याने असे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत.चिपळूणात सापडलेल्या गुटख्याची वाहने लक्षात घेता शहरात असा बनावट गुटख्याचा कारखाना असावा असा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.