चिपळूणच्या एन्रॉन पुलाच्या कामाचे टेंडर मे महिन्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूणमधील एन्रॉन पुलाच्या कामाचे टेंडर या वर्षीच्या मे महिन्यापर्यंत काढण्यात येतील असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील खाडीपट्टा भागातील गावांना जोडणारा पूल व जोडरस्त्याच्या दुरुस्तीच्या संदर्भात शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. खाडीपट्टा भागातील सुमारे 50 गावांना जोडणारा पूल कोटय़वधी रुपये खर्च करून देवणे येथे जगबुडी नदीवर बांधण्यात आलेला पूल व जोडरस्त्याची दुरवस्था झाली असल्याबाबत विचारणा केली. त्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले. जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलाच्या जोडरस्त्याचे काम क्षतीग्रस्त झाले. पण संबंधित कंत्राटदाराकडून पोच मार्गाची दुरुस्ती करण्यात आल्याचे ते म्हणाले. या प्रश्नाच्या निमित्ताने भास्कर जाधव यांनी एन्रॉन पुलाच्या बांधकामाचा उपप्रश्न उपस्थित केला होता.