चिपळूण- वासिष्ठी आणि शास्त्री पूल अतिधोकादायक

735

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील वाशिष्टी आणि संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री हे दोन ब्रिटिशकालीन पूल अतिधोकादायक असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

फेब्रुवारी 2017 पासून गेली सलग तीन वर्षे महामार्गावरील 18 मोठ्या पुलांसह 72 पुलांची तपासणी सुरु आहे. यातून 21 पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणसुरु असल्याने जुन्या पुलांवर खर्च करणे टाळण्यात येत आहे.

याच तपासणीत वाशिष्टी आणि शास्त्री पुल अतिधोकादायक असल्याची बाब पुढे आली आहे. या दोन्ही पुलांच्या नव्याने स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पुणे येथील स्टक्ट सोर्स इंजिनिअरिंग कंपनीची नियुक्त करण्यात आली असून दोन दिवसापूर्वी या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही पुलांची प्राथमिक पाहणी केली आहे. दरम्यान या पुलांच्या चार दिवसात हॅमर टेस्ट होणार असून त्यानंतर यावरील वाहतुकीचे काय होणार हे स्पष्ट होइल.

आपली प्रतिक्रिया द्या