
कधी आणि कसे वापरावे
व्हिटॅमिन सी सीरमच्या सर्वोत्तम परिणामांसाङ्गी काळजीपूर्वक वापर आवश्यक आहे. ऑण्टिऑक्सिडंट म्हणून व्हिटॅमिन सी जर सूर्यप्रकाश आणि पर्यावरणीय प्रदूषकांच्या संपका&त आले तर फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करू शकते. सकाळी व्हिटॅमिन सी सीरमचा वापर केल्यास दिवसभर नुकसान टाळता येते. तथापि, कधी कधी एखाद्या उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा अस्थिर असू शकते आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना ते कमी होऊ शकते म्हणून काही जण रात्री व्हिटॅमिन सी सीरम वापरण्याची शिफारस करतात. तुम्ही सकाळी तुमचे व्हिटॅमिन सी सीरम वापरणार असाल तर तुमच्या त्वचेच्या अधिक संरक्षणासाङ्गी ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा.
व्हिटॅमिन सी आपल्याला त्वचेच्या अनेक समस्यांशी लढण्यास मदत करू शकते. व्हिटॅमिन सी सीरम सर्व त्वचेच्या प्रकारांसाङ्गी चांगले असते. मात्र संवेदनशील त्वचा असलेल्यांनी हे सीरम वापरताना काळजी घ्यावी. त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून त्वचेच्या प्रकारांनुसार तयार केलेली विशेष उत्पादने निवडावी.
बाजारात असंख्य प्रकाराचे व्हिटॅमिन सी सीरम उपलब्ध आहेत. तुमच्या त्वचेच्या प्रकारासाङ्गी सर्वोत्तम व्हिटॅमिन सी सीरम शोधावे लागेल.
सेन्सिटिव्ह स्किनसाठी
मॅग्नेशियम एस्कॉर्बिल फॉस्फेट एक पाण्यात विरघळणारा प्रकार संवेदनशील त्वचेसाङ्गी एक चांगला पर्याय असू शकतो.
तेलकट त्वचेसाठी
एल-एस्कॉर्बिक ऑसिड असलेले सीरम शोधा.
व्हिटॅमिन सीचा एक शक्तिशाली प्रकार जो तेलकटपणा कमी करण्यात आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करू शकतो.
व्हिटॅमिनची पातळी
सीरममधील व्हिटॅमिन सीची पातळी महत्त्वाची आहे. 10-20 टक्के कॉन्सनट्रेशन सामान्यतः बहुतेक लोकांसाङ्गी प्रभावी असते. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही कमी कॉन्सनट्रेशनने सुरुवात करू शकता.
थोडक्यात काय तर, एखादे स्ट्राँग पिंवा महागडे सीरम शोधण्यापेक्षा तुमची त्वचा निरोगी आणि तेजस्वी राहील असे सीरम शोधा.
मृणाल घनकुटे
























































