नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

1665

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य याच्याविरोधात एका महिलेने लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश आचार्य याच्यावरचा हा दुसरा आरोप असून यापूर्वी त्याच्यावर तनुश्री दत्ता हिने छेडछाडीचा आरोप केला होता.

एका 33 वर्षीय नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या महिलेने गणेशवर काम मिळू न देणे, लाच मागणे आणि जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ दाखवणे हे आरोप केले आहेत. राज्य महिला आयोग आणि आंबोल पोलीस स्टेशनमध्ये या महिलेने तक्रार नोंदवली आहे. गणेश हा इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशनचा अध्यक्ष आहे.

महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, गणेशने त्याच्या अधिकाराचा गैरवापर करून तिचं असोसिएशनचं सदस्यत्व रद्द केलं. त्यामुळे तिला कुठेही काम मिळू शकलं नाही. एका कार्यक्रमावेळी गणेशच्या सांगण्यावरून त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या नृत्य दिग्दर्शकांनी आपल्याला मारहाण केली आणि तिथून हाकलून द्यायचा प्रयत्न केल्याचंही तिने म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या