
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशमध्ये एका पतीने आपल्या पत्नीला हुंड्यासाठी छळले आणि हुंडा न दिल्यास तलाकची धमकी दिली होती. जेव्हा पत्नी बधली नाही तेव्हा नराधम पतीने पत्नीवर ऍसिड हल्ला केला. त्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.
उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील ही घटन आहे. 10 महिन्यापूर्वी महिलेचे फिरोज या तरुणाशी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर फिरोज आणि त्याच्या घरच्यांनी महिलेकडे हुंडा म्हणून घर आणि गाडीची मागणी केली होती. या मागणीला महिलेने साफ नकार दिला. नंतर फिरोजने पत्नीला तलाक देण्याची धमकी दिली तरी महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर फिरोजने आपल्या पत्नीवर ऍसिड फेकले. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली. तिला इस्पितळात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या सासरच्यां मंडळीवर गुन्हा दाखल केला असून महिलेचा पती आणि सासरा फरार आहे. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
























































