रामदास स्वामींच्या जीवनावर ‘श्री राम समर्थ’ चित्रपट

1029

बालवयात निस्सीम रामरायाची भक्ती आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत समाजोपयोगी कामांसाठी देशाटन करणारे संत रामदास स्वामी यांच्या जीवनावर येत्या 1 नोव्हेंबर रोजी ‘श्री राम समर्थ’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  घराघरातील संस्कारांचा पाया असलेले ‘मनाचे श्लेक’ चे उद्गाते रामदास स्वामी यांनी दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढय़ांपासून जपला जात आहे. त्यांनी लिहिलेला ‘दासबोध’ ग्रंथ आजच्या दैनंदिन कठीण प्रसंगात मार्गदर्शक ठरतो. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे आणि मार्गदर्शनाचे अनेक पैलू ‘श्री राम समर्थ’ चित्रपटात उलगडणार आहेत. अभिनेता शंतनु मोघे हा रामदास स्वामींची भूमिका साकारणार आहे.

 विप्र एंटरटेनमेंटच्या अश्विनी माहेश्वरी आणि  दिशादीपा फिल्म्सच्या दीपा सुरवसे यांची निर्मिती असून हा चित्रपट भारती राठी आणि संजय राठी यांनी प्रस्तुत केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष तोडणकर असून मूळ संकल्पना किजया माहेश्करी यांची आहे. स्त्रियांचा आदर आणि महिला सबलीकरणाचे समर्थ खरेखुरे पुरस्कर्ते  होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य लढय़ात रामदास स्वामींनी कशाप्रकारे साथ दिली हेदेखील चित्रपटात बघावयास मिळेल. महेश कोकाटे, अलका कुबल-आठल्ये, सौरभ गोखले, सयाजी शिंदे, प्रकाश सुरवसे, हृदयनाथ राणे, करण बेंद्रे, विजया सुमन, बालकलाकार अद्वैत राईलकर यांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या