शूटिंगची झाली सर्कस, मेगाबजेट सिनेमा पूर्ण करण्यासाठी करावी लागतेय कसरत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोरोनाच्या दुसऱया लाटेने मेगाबजेट सिनेमांच्या शूटिंगला ब्रेक लागला आहे. शूटिंग पूर्ण करण्यासाठी काही युक्त्या, शक्कल लढवल्या जात आहेत. मात्र सर्कच सिनेमांसाठी या युक्त्या चालत नाहीत. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ सिनेमाचे जवळपास सर्कच शूटिंग पूर्ण झाले आहे. फक्त एक दिवसाचे शूटिंग शिल्लक आहे. ते एका दिवसाचे शूटिंगदेखील मागील 18 दिवसांपासून खोळंबले आहे.

रणवीर सिंह, जॅकलीन फर्नांडीस आणि पूजा हेगडे यांच्या ‘सर्कस’ सिनेमाची पूर्ण टीम 12 एप्रिल रोजी शूटिंगसाठी उटी येथे जाणार होती. 50पेक्षा जास्त ज्युनियर आर्टिस्ट तसेच 100हून क्रू मेंबर्स असा फौजफाटा होता. मात्र त्यांना उटीच्या प्रशासनाने परवानगी नाकारली. ‘सर्कस’च्या निर्मात्यांनी उटीचा सेट मुंबईच्या मेहबूब स्टुडियोत उभारायला सुरुवात केली. मात्र महाराष्ट्रातही शूटिंग थांबल्याने ‘सर्कस’ सिनेमा अद्याप लटकला आहे. ‘सर्कस’ हा रोहित शेट्टीचा असा पहिला सिनेमा असेल ज्याचे शूटिंग जास्तीत जास्त स्टुडियोत होतंय.

‘सर्कस’च्या व्यतिरिक्त अनेक मोठय़ा सिनेमांचे शूटिंग थांबले आहे. आलिया भट हिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचेही एक दिवसाचे शूटिंग खोळंबले आहे. अजय देवगणचे ‘मेडे’ आणि ‘मैदान’ हे सिनेमा, शाहरुख- दीपिकाचा ‘पठाण’, सलमान-कतरिनाचा ‘टायगर-3’, वरुण धवनचा ‘जुग जुग जियो’ या सिनेमांचे शूटिंग रखडले आहे.