इस्रायलमध्ये पंतप्रधानांविरोधात नागरिकांची निदर्शने

गाझामधील युद्धाला नऊ महिने पूर्ण होत असताना इस्रायलमधील नागरिकांनी रविवारी देशभरातील महामार्ग रोखून धरत पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना पायउतार होण्याचे आवाहन केले.

7 ऑक्टोबर रोजी सीमापार हल्ले केल्यानंतर पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने सुरू केलेल्या युद्धात 1 हजार 200 नागरिक ठार झाले, तर 250 जणांना ओलीस ठेवले गेले. इस्रायलने हवाई आणि जमिनीवर केलेल्या हल्ल्यात 38 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. रविवारी सकाळी नागरिकांनी इस्रायलमधील मुख्य रस्ते अडवले आणि संसद सदस्यांच्या घराबाहेर निदर्शनेही केली.