नागरिकता सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर

6216

नागरिकता सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत हे विधयक सादर केले. हे विधेयक राज्यसभेत 125 मतांनी मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधात 105 मते टाकण्यात आली. या विधेयकावर राज्यसभेत सुमारे सहा तास वादळी चर्चा झाली. या चर्चेला अमित शहा यांनी सविस्तर उत्तर दिले. अमित शहा यांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. या विधेयकामुळे कोणाचेही नागरिकत्व रद्द होणार नसून शरणार्थींना नागरिकत्व देण्याबाबतचे हे विधेयक आहे. नेहरू -लियाकत करार पाळण्यात आला असता आणि धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली नसती तर आज हे विधेयक मांडण्याची गरज भासली नसती, असेही शहा यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत आहे, असा आरोप शहा यांनी केला.

या विधेयकात सुधारणेची गरज असून दुसरुस्तीसाठी हे विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवण्याबाबतच्या विरोधकांच्या प्रस्तावांवर मतदान घेण्यात आले. हा प्रस्ताव 124 मतांनी फेटाळण्यात आला. प्रस्तावाच्या बाजूने 99 तर विरोधात 124 मते मिळाली. त्यामुळे हे विधेयक आता सिलेक्ट समितीकडे पाठवण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे विरोधकांच्या विविध सूचनांच्या प्रस्तावावर आवाजी मतदान घेत प्रस्ताव फेटाळण्यात आले. राज्यसभेत शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

निर्वासितांना स्वीकारलं पाहिजे, पण घुसखोरांना हाकला; शिवसेनेची जोरदार मागणी

आपली प्रतिक्रिया द्या