खामगावात मंदिरासमोर हाडे फेकली, हिंदू-मुसलमान समाजात दंगल उसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा/खामगाव

शनिवारी सायंकाळी खामगाव नजीकच्या सजनपुरी परिसरात हिंदू व मुस्लिम समाजात दंगल उसळून दगडफेक करण्यात आली. पाऊस सुरू झाला तरीही दगडफेक थांबली नाही. यामुळे रस्त्यावर दगडांचा खच पडला होता व सर्वत्र शुकशुकाट होता. यामध्ये अनिल बेनीवाल, किशोर नाईक, किसन सावरकर, योगेश राऊत हे चार जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लीम महिला सरपंचाच्या मुलाने मंदिरासमोर हाडे फेकली असता त्याला काही लोकांनी हटकले. याचाच राग घरत त्याने मुसलमान गुंडाना जमा करुन हटकणार्‍यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच गोंधळी समाजाचे ५-६ घरे तोडली व साई मंदिराची तोडफोड केली. मुसलमान टोळक्याने तुफान दगडफेक केली. यावेळी संभाजीनगर येथील नटवरलाल गोपीलाल पल्लोड हे मारुती कार (एम.एच. २० एए २९१४) घेऊन खामगावकडे जात होते. त्या गाडीवर दगडफेक केल्याने नटवरलाल हे जखमी झाले.

सजनपुरीची मुसलमान सरपंच हिचे नातेवाईक व मुलगा मुज्जू आणि शाहरुख यांनी ही दंगल भडकवण्यास सुरुवात केली. घटनास्थळी तातडीने पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील, अति. पोलीस अधिक्षक घुगे हे दाखल झाले. त्याच दरम्यान पाऊस सुरू झाला. भर पावसातही तुफान दगडफेक सुरू होती. सरपंचाचा नातेवाईक मुज्जू व माजी सरपंच गफ्फार यांनी हिंदू महिलांवरही दगडफेक करायला लावली. पोलिसांचा परिसरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांची कारवाई सुरू असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नाही.