
जागतिक नकाशावर असलेले मुंबई हे शहर केवळ काँक्रीटीकरणासाठी नव्हे तर त्याच्या सौंदर्यासाठीही ओळखले जायला हवे. तेव्हा डेब्रिज, कचरा टाकून तसेच बेकायदा फ्लेक्समुळे मुंबईला विद्रूप करू नका. डेब्रिज-कचरा टाकून तसेच अवैध व विनापरवाना फलक लावून शहराचे सौंदर्य बिघडविणाNयांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे ‘स्वच्छ मुंबई-सुंदर मुंबई’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाNया उपाययोजनांचा आढावा घेतला. मुंबईच्या सर्व वॉर्डांतील सहाय्यक आयुक्त तसेच प्रभाग अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुंबईतील हवेचे प्रदूषण वाढले असून यामुळे दृश्यमानताही कमी झाली आहे. यावर उपाय योजण्याची आवश्यकता आहे. रस्ते, पदपथ याबरोबरच सर्व्हिस रोडवरील हरित पट्टे राखून उड्डाणपुलांखालील जुनी वाहने काढून तेथील जागांचे सौंदर्यीकरण करण्याकडेही लक्ष द्यायला हवे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी दिसणाNया फलकांमुळे मुंबई विद्रूप होत असून महापालिकेने यासाठी धोरण आखावे. अवैध व विनापरवाना फलक लावून शहराचे सौंदर्य बिघडविणाNयांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी. या अवैध फलकांना आळा घालण्यासाठी आपण सर्वच राजकीय पक्षांशी स्वत: संवाद साधू, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
या बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, पोलीस आयुक्त संजय बर्वे, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
वाहतूक व्यवस्थापन अभ्यास व्हावा – आमदार आदित्य ठाकरे
मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचे वाहतूक व्यवस्थापन अभ्यास करणे आवश्यक आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील तसेच शहरातील इतर उड्डाणपुलांखालील जागांचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. तसेच सेवा मार्गावर व्हर्टिकल गार्डनची संकल्पना राबविण्यात यावी. मुंबईतील रस्त्यांवर लावण्यात येणाNया फलकांमधील (होर्डिंग) अंतर ठरविण्यात यावे. शहरात मेट्रोची कामे सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते. पुढील वर्षी पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी नाले, गटारे सफाईवर लक्ष द्यावे. यावेळी रस्ते, पदपथ, वाहतूक बेटे यांच्या सौंदर्यीकरणाच्या मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना यशस्वी झाल्यास त्या सर्व महानगरपालिकांमध्ये राबविण्यात येतील, अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुंबईकरांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या. मुंबईतील रस्ते, पदपथ, वाहतूक बेटे, उद्याने, मनोरंजन मैदाने, मंडई, शालेय परिसर, आरोग्य, पाणी आदी विविध नागरी सेवासुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी यंत्रणांनी एकसंध राहून काम करायला हवे. सर्व्हिस रोडवरील भिंती सुशोभित करण्यासाठी मुंबईतील जागतिक दर्जाच्या कलाकारांची मदत घ्यावी.
उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा यांचा गौरव
मुंबईतील वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, पदपथ सुव्यवस्थित करणे, रेलिंग, स्थानिक वातावरणात टिकणारी व पुâलणारी झाडे लावणे आदी कामांना प्राधान्य द्यावे. सव्र्हिस रोडवरील भिंती सुशोभित करण्यासाठी मुंबईतील जागतिक दर्जाच्या कलाकारांची मदत घ्यावी. मुंबईतील ५२ पैकी ५० मंडर्इंच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित दोन मुंबईचा विकास करण्यासाठी महापालिकेने लक्ष द्यावे. या सर्व कामांच्या आढाव्यासाठी दर तीन महिन्यांनी सहाय्यक आयुक्तांची बैठक घेण्यात येईल. चांगले काम करणाNया सहाय्यक आयुक्तांचा या बैठकीत सत्कार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
विकास नियमावलीनुसारच विकास
मुंबईचा विकास हा विकास नियमावलीनुसारच व्हायला हवा. विकास हा सर्वांगीण असायला हवा. मुंबईकरांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या. मुंबईतील रस्ते, पदपथ, वाहतूक बेटे, उद्याने, मनोरंजन मैदाने, मंडई, शालेय परिसर, आरोग्य, पाणी आदी विविध नागरी सेवासुविधा जागतिक दर्जाच्या करण्यासाठी यंत्रणांनी एकसंध राहून काम करायला हवे. यासाठी विविध शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे समन्वय साधावा. नागरिकांसाठी चांगले पदपथ असायला हवेत तरच त्याचा वापर होईल. मुंबईच्या लौकिकात भर पडून मुंबई पाहण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढेल. यासाठी प्रयत्न करावेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
शहर कचरामुक्त करण्यासाठी कालमर्यादा ठरवा
शहरामध्ये जागोजागी डेब्रिज, कचरा टाकण्यात येत आहे. अशा प्रकारे डेब्रिज टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी. डेब्रिज, कचरा वेळोवेळी उचलण्यात यावा, यासाठी मुंबई डेब्रिजमुक्त व कचरामुक्त करण्यासाठी कालमर्यादा ठरविण्यात यावी. मुंबईत या वर्षी पाणी साचणार नाही यासाठी पदपथ, नाले, गटारे यांची स्वच्छता राखा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.




























































