
सामना ऑनलाईन । कोल्हापूर
कोल्हापूर, सांगलीमधील पूरपरिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कोल्हापूरची हवाई पाहणी केली. कोल्हापूरमध्ये पूरग्रस्तांची भेटही घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हवामान खराब असल्याने सांगली दौरा रद्द करावा लागल्याची माहिती दिली. तसेच सांगलीतील ब्रह्मनाळमध्ये झालेल्या बोट दुर्घटनेबाबतही वक्तव्य केले.
LIVE : सांगलीतील परिस्थिती अतिशय गंभीर – फडणवीस
Photo- सांगली,कोल्हापुरातील पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
ब्रम्हनाळ दुर्घटना- आजीच्या कुशीतच चिमुकलीचा मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना
सांगलीतील ब्रह्मनाळमध्ये झालेल्या दुर्घटनेमधील बोट खासगी होती. तेथील एका ग्रामपंचायतने या बोटीची व्यवस्था केली होती. या बोटीमध्ये चढू नका असे आम्ही सांगू शकत नाही, परंतु क्षमतेपेक्षा जास्त लोक यामध्ये भरली गेली. बोटीमध्ये पाणी शिरल्याने ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच पुरात मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.




























































