कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अनुपस्थित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोलकाता पोर्ट ट्रस्टचा आज 150 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोजित कार्यक्रमात पोहोचले आहेत. परंतु या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अनुपस्थित राहिल्या आहेत. पोर्ट ट्रस्टच्या अधिकार्‍यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना आमंत्रणही पाठवले होते.

शनिवारी पंतप्रधान मोदी कोलकात्यात पोहोचले होते. तेव्हा दोन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर होत्या. रविवारी सकाळी बेलुरमध्ये पंतप्रधान मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर वक्तव्य केले होते. त्यावर मुख्यमंत्री बॅनर्जी नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

बेलुरच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यार्‍यांवर टीका केली होती. काही राजकीय नेते कायद्याविरोधात खोटे पसरवत असल्याचे मोदींनी सांगितले.