20 एप्रिलनंतर राज्यातील उद्योग सुरू होणार – मुख्यमंत्री

40614

मुंबई, पुणे, नागपूरसह ज्या शहरांमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत ती शहरे वगळून राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक उपक्रम 20 एप्रिलनंतर सुरू करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मात्र हे उद्योग पुरेशी काळजी घेऊन तसेच अर्टी व शर्तींच्या अधीन राहूनच सुरू होतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाचा मुकाबला करणे हे लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट अबाधित ठेवून कंण्टेन्मेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे आदेश लागू राहतील. 3 मेपर्यंत लॉकडाऊन असून सोशल डिस्टन्सिंग, नियमित मास्क घालणे अशा कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत. धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी बजावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या