वांद्रे-वर्सोवा सी लिंक पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाद्रे-वर्सोवा सी लिंकमुळे वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत होणार असून हा सागरी मार्ग 2025 पर्यंत पूर्ण होईल. हा सागरी महामार्ग पूर्ण करताना जुहू कोळीवाडा एक्झीट आणि वर्सोवा येथून पश्चिम द्रूतगती महामार्गाला जोडा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या वांद्रे-वर्सोवा सी लिंक आणि वर्सोवा-विरार सी लिंक या दोन प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित या बैठकीत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी या दोन्ही प्रकल्पांचे सादरीकरण केले.

2025 पर्यंत प्रकल्प पूर्ण

वांद्रे-वर्सोवा हा सी लिंक 9. 6 किमी लांबीचा आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटून इंधनाची बचत होईल आणि प्रकासाचा वेळ वाचेल. हा सागरी महामार्ग 2025  पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.

वर्सेव्याहून थेट विरारला

वर्सोवा-विरार या 42. 74 किमी. लांबीच्या सागरी मार्गाचा पूर्व सुसाध्यता अहवाल (फिजिब्लीटी स्टडी) पूर्ण करण्यात आला आहे. वर्सोवा ते कसई आणि वसई ते विरार या दोन टप्प्यात या प्रकल्पाचे काम होईल. सागरी किनाऱ्याला समांतर असणाऱ्या या सागरी सेतूमुळे वर्सोवा ते विरार या मार्गावरील वाहतूक वेगवान होईल.

अर्थव्यवस्थेला चालना

या दोन्ही सागरी सेतू मार्गामुळे या भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगार संधी वाढतील असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कोकणातील सिंचन प्रकल्प पूर्ण करा

विदर्भातील गोसेखुर्द तसेच कोकणातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रकल्पांच्या संदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.

मासेमारी नौकांना अडथळा नाही

हा सागरी मार्ग बांधताना पर्यावरणाचा किचार केला आहे. मच्छीमारांच्या बोटींच्या वाहतुकीला अडचण होणार नाही. चार ठिकाणी मच्छीमार व इतर नौकांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी मोकळी जागा ठेवण्यात येणार आहे. सविस्तर अहवाल तयार करा. त्यावर वर्सोवा–विरार सागरी सेतू मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडकिण्यासाठी तसेच सुखकर प्रकास होण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प महत्वाचे आहेत. या दोन्ही प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करा.

मुख्यमंत्री उद्धक ठाकरे