मराठा आरक्षणासाठी सर्वांच्या सहकार्याने न्यायालयीन लढाई, मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढय़ासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यावेळी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, ज्येष्ठ विधिज्ञ विजयसिंह थोरात, मुख्य सचिव संजय कुमार, शिष्टमंडळासोबत आमदार विनायक मेटे, विनोद पाटील यांच्यासह मराठा समाजाचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा उपस्थित होते.

टिम म्हणून प्रयत्न

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी राज्य सरकार सर्व प्रयत्न करत आहे. आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक टिम म्हणून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.