
सामना ऑनलाईन । मुंबई
सरकारने नवी दिल्लीत सीएनजीचे दर वाढवल्यानंतर आता मुंबईतही सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी चाट बसणार आहे. सीएनजीच्या दरात 2.66 रुपये प्रतिकिलो तर पीएनजीच्या दरात 1.89 रुपये प्रतिकिलो इतकी वाढ करण्यात आल्याचे महानगर गॅस लिमिटेड कंपनीने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्या आहेत. तसेच दहेज-उरण-पनवेल आणि दाभोळ येथून आणण्यात येणाऱया गॅसच्या वाहतुकीचा खर्च वाढल्याचा परिणामही सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीवर झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

























































