रत्नागिरीच्या चार अधिकाऱ्यांना तटरक्षक दलाचे ‘महासंचालक प्रशंसा पदक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

रत्नागिरीच्या तटरक्षक दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत इथल्या चार अधिकार्‍यांना  ‘महासंचालक प्रशंसा पदक’ जाहीर केले आहे. तटरक्षक दलाच्या वतीने दिले जाणारे सर्वोच्च प्रशंसा पदक आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी एकाच कार्यालयातील किंवा जहाजावरील चार कर्मचार्‍यांना हे पदक मिळणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. उप समादेशक एस चौहान, प्रधान अधिकारी आय.के.बालन, सहाय्यक अनुभाग अधिकारी श्री विजय नरसाळे आणि लिडिंग हँड फायरमन श्री सुभाष सिंह यादव या चौघांचा हे पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे. या अधिकार्‍यांच्या टीमने धावपट्टी विस्तार – अद्ययावतीकरण आणि मुख्य प्रशासकीय इमारतीचे रखडलेले बांधकाम वेळेत पूर्ण करून दाखवले आहे. त्यांच्या कामामुळे रत्नागिरी विमानातळवरून  सैन्य दलाच्या आणि चार्टर्ड (खाजगी) विमानांचे लँडींग आणि टेकऑफ सुरू झाले आहे.