ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच महागाईचा झटका, गॅस सिलिंडरच्या दरात 209 रुपयांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑक्टोबर महिन्याची सुरुवात महागाईने झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 209 रुपयांची वाढ केली आहे. दसरा, दिवाळी हे सण तोंडावर असताना व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने नमकीन, मेवा-मिठाईसाठीही जास्त रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये 158 रुपयांची कपात केली होती. मात्र आता बरोबर महिनाभराने यात वाढ केली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी 1731.50 रुपये मोजावे लागतील.

प्रमुख शहरातील किंमती

दिल्ली – 1731.50 रुपये
मुंबई – 1684 रुपये
लखनौ – 1845 रुपये
चेन्नई – 1898 रुपये
बंगळुरू – 1813 रुपये
कोलकाता -1839 रुपये

दरम्यन, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत वाढली असली तरी घरगुती एलपीजीच्या दरात कोणताही वाढ करण्यात आलेली नाही. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी घरगुती सिलिंडरचे दर 200 रुपयांनी कमी झाले होते.