
राज्य सरकारने डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान केमिकल पंपनीत झालेल्या स्पह्ट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उद्योग विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. येत्या तीन आठवडय़ांत या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांबरोबर कामगार विभागाचे प्रधान सचिव आणि पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांचा या समितीमध्ये समावेश आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दोन वर्षांपूर्वी एमआयडीसी आणि त्यातील केमिकल पंपन्यांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय झाला होता. 2022 मध्ये ठरावदेखील झाला होता. मागील एक वर्षापासून पातळगंगा, जांभवली येथे जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आलेली आहे, परंतु आचारसंहितेमुळे ते काम थांबले होते. निवडणूक आयोगाने उद्योजकांना जागावाटप करण्याची परवानगी द्यावी यासाठी शासनाकडून पत्र देण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी यावेळी दिली.
डोंबिवलीतील कंपन्यांचे दिघी बंदराजवळ स्थलांतरण
एमआयडीसींमधील केमिकल पंपन्यांचे लवकरच स्थलांतरण केले जाणार आहे. पुढील 25 वर्षे लोकवस्ती होणार नाही अशा ठिकाणी या पंपन्यांचे स्थलांतरण केले जाईल, अशी माहितीही उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी दिली. दिघी बंदराजवळील 15 एकर जागा त्यासाठी ठरवण्यात आल्याचे ते म्हणाले.
रत्नागिरीतील आंदोलनामुळे गेल कंपनी गेली
गेल इंडिया पंपनीचा 50 हजार कोटींचा उद्योग महाराष्ट्रात येणार होता, परंतु भाजप आणि मिंधे सरकारमुळे तो मध्य प्रदेशात गेला. याप्रकरणी उद्योगमंत्र्यांना यावेळी विचारले असता त्यांनी त्यातून हात झटकले. गेल पंपनीने महाराष्ट्र सरकारकडे परिपूर्ण प्रस्ताव दिलाच नव्हता, असा दावा त्यांनी केला. गेल इंडियाने रत्नागिरीत जागा मागितली होती त्यावेळी तेथील एमआयडीसीमध्ये जागा नव्हती आणि जागा उपलब्ध झाली तेव्हा गेल कंपनीने रत्नागिरीतील रिफायनरीविरोधी आंदोलनाचे कारण सांगितले आणि नंतर पुन्हा प्रस्ताव दिलाच नाही, असे सामंत यांनी सांगितले.
मलय मेहताच्या पत्नीला अटक
डोंबिवली एमआयडीसीतील स्फोट प्रकरणात अमुदान पंपनीचे मालक मलय मेहता यांची पत्नी स्नेहा मेहताला उल्हासनगर क्राइम ब्रँचने आज अटक केली. अमुदान पंपनीत मलय सोबत त्याची पत्नी स्नेहा देखील भागीदार आहे. या दोघांनाही उद्या बुधवारी कल्याणच्या कोर्टात हजर केले जाणार आहे.
अमुदाय केमिकल पंपनीत गुरुवारी रिऍक्टरचा स्पह्ट होऊन 16 कामगारांचा बळी गेला आहे. तर 68 कामगार गंभीर जखमी झाले. व्यवस्थापनच्या बेफिकिरीमुळे दुर्घटना झाल्याचा ठपका पंपनी मालक मलय मेहता आणि भागीदारांवर ठेवला आहे. याआधीच मलयला अटक केली आहे. आज त्याच्या पत्नीला अटक केली. मलयची पोलीस कोठडी मंगळवारी संपणार आहे. त्यामुळे त्यालाही पत्नी स्नेहासोबत कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.
































































