एअर इंडिया कोण खरेदी करणार? टाटा, स्पाईसजेटमध्ये रस्सीखेच

सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या खरेदी प्रक्रियेत टाटा ग्रुप आणि स्पाईसजेट या दोन खासगी विमान कंपन्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अनेक खासगी विमान कंपन्यांनी एअर इंडियाच्या खरेदीसाठी ’एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (ईओएल) दाखल केले होते. मात्र मूल्यांकन प्रक्रियेत या कंपन्यांचा पत्ता कट झाला असून आता एअर इंडिया खरेदीत केवळ टाटा आणि स्पाईसजेटच रांगेत आहेत.

एअर इंडियाचे व्यवहार सल्लागार इच्छुक खरेदीदारांशी संपर्क साधत आहेत. टाटा सन्स आणि स्पाईसजेट व्यतिरिक्त टाटा सन्स आणि न्यूयॉर्कस्थित इंटरप्स इंक संयुक्त भागीदारीत एअर इंंडिया खरेदीसाठी इच्छुक आहे. इंटरप्स इंक अमेरिका आणि युरोपमधील नॉन रेसिडेन्स इंडियन (एनआरआय) गुंतवणूकदारांचा ग्रुप आहे. एअर इंडियाची विक्री प्रक्रिया पारदर्शकपणे दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात इच्छुक कंपन्यांकडून ईएलओ मागविण्यात आले. योग्यतेनुसार कंपन्यांचे ईएलओ मंजूर करण्यात आले. दुसऱया टप्प्यात पात्र खरेदीदारांना रिक्वेस्ट फॉर प्रपोजल देण्यात येणार आहे.

20 वर्षांपासून एअर इंडिया विक्रीचा प्रयत्न

मागील 20 वर्षांपासून एअर इंडिया विकण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यावेळी 20 टक्के भाग विकण्याचा प्रयत्न होता. मात्र सरकारी अटी आणि कर्जामुळे डुबलेल्या एअर इंडियाला खरेदीसाठी पुणी पुढे येत नव्हते. तसेच 2017 मध्ये 74 टक्के भाग विकण्याचा विचार करण्यात आला होता. पुढे पूर्ण 100 टक्के कंपनी विकण्याचे निश्चित झाले.

एअर इंडिया खरेदीसाठी हे उत्सुक

एस्सार ग्रुप, पवन रुईया यांची कंपनी डनलप, फाल्कन टायर्स त्याचबरोबर एअर इंडियाच्या 209 माजी कर्मचाऱयांनीही एकत्र येऊन एअर इंडिया खरेदीसाठी ईएलओ दिले होते.

  • एअर इंडियावर 38 हजार 366 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
  • सरकारी खात्याने एअर इंडियाचे 500 कोटी रुपये थकवले आहेत.
  • एअर इंडियाकडे एपूण 46 हजार कोटी रुपयांची संपत्ती असून यात जमीन, इमारतींचा समावेश आहे.
आपली प्रतिक्रिया द्या