
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
तालुक्यातील कान्हेगाव हनुमानवाडी येथील विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरकडील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
याबाबत माहिती अशी की कविता बाबासाहेब कडेकर (25) हिचा सासरच्या मंडळीने घरातील व शेतातील कामावरून शारिरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले. अशी फिर्याद अजिनाथ नारायण काळे (28) राहणार तिडी तालुका वैजापुर जिल्हा औरंगाबाद यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिसात दिली आहे. सदर फिर्यादीवरून पोलिसांनी बाबासाहेब यशवंत कडेकर (नवरा) लहानुबाई यशवंत कडेकर, दिगंबर यशवंत कडेकर व कविता यशवंत कडेकर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे पोलीस निरीक्षक प्रवीण चंद्र लोखंडे यांनी भेट दिली असून तपास पोलिस पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहेत.

























































