शालेय शुल्काविषयीच्या तक्रारी सोडविणे होणार सोपे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालेय शुल्काविषयीच्या पालकांच्या तक्रारी सोडविणे आता सोपे होणार आहे. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. एम. ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पुनरिक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे.

भरमसाट वाढणाऱया शालेय शुल्काला लगाम बसावा तसेच पालकांना तक्रारीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी राज्य सरकारने विभागवार शालेय शिक्षण शुल्क समित्यांची स्थापना केली आहे. त्याचबरोबर आता ही पुनरिक्षण समितीही नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये सनदी लेखापालांची आणि सेवानिवृत्त संचालक यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या समितीच्या माध्यमातून आता पालकांना त्यांच्या शुल्काबाबतच्या तक्रारी सोडविणे सोपे होणार आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्व समितीचे ई-मेल आयडी, पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे पालकांना आता थेट कार्यालयात जाऊन समितीची भेट घेता येऊ शकणार आहे. तसेच या समितीचा तपशील लवकरच राज्यातील उपसंचालक व संबंधित शिक्षण अधिकारी यांनी शाळेच्या वेबसाइटवर आणि सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही तत्काळ करावी असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

– राज्यस्तरावरील पुनरिक्षण समिती आणि मुंबई विभागीय उपसंचालक

ई-मेल ः [email protected]

(022) 23630081/ 23630090/ 23630086.