कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांनो सावधान, होऊ शकतात हे आजार

1713

कॉम्प्युटर ही आता काळाची गरज आहे. कमी वेळात अधिक वेगाने काम करणारे कॉम्प्युटर आता प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त कामं करता येत असली तरी या कॉम्प्युटरमुळे अनेकांना शारिरीक व्याधीही जडत असल्याचे समोर येत आहे.

यात प्रामुख्याने कंबर दुखी, मानदुखी, डोळे लाल होणे,डोळ्यातून सतत पाणी येणे यासाऱखे विकार होत आहेत. त्याचबरोबर कॉम्प्युटरवर काम करताना एकाचजागी जास्तवेळ बसावे लागत असल्याने शरीराच्या आकारातही बदल होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काहींना एकाच जागी बसून राहावे लागत असल्याने पाय सूजण्याचा विकार जडावला आहे. ही सर्व भविष्यातील गंभीर आजारांची लक्षणे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

रिपिटिटेव्ह स्ट्रेन इंजरी-

कॉम्प्युटरवर सतत काम करत असल्याने डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे दृष्टीवरही परिणाम होतो. कॉम्प्युटर स्क्रीनवर सतत बघितल्याने दृष्टीपटलावर ताण येतो. त्यामुळे डोळ्यांची जळजळ होते. डोळ्यात काहीतरी टोचत असल्यासारखे वाटते. डोळ्यांनी सूज येते. खाज येते व जडपणा येतो. जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. कधी कधी तर एका वस्तूच्या जागी दोन वस्तू दिसू लागतात.

ड्राय आय सिंड्रोम

कॉम्प्युटरवर सतत काम करत असल्याने डोळयातील ओलावा कमी होतो. डोळे कोरडे होतात. त्याचा परिणाम दृष्टीवर होतो. हे टाळण्यासाठी काम करताना नेहमी डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करावी. 5 ते 10 मिनिट डोळे बंद करावे.

कॉम्प्युटरचा ब्राईटनेस कमी करावा. ज्यामुळे डोळ्यांना त्रास होणार नाही.

कॉम्प्युटरवर काम करताना नेहमी ताठ बसावे. त्यामुळे कंबरदुखी होणार नाही.

तसेच कॉम्प्युटरवर काम करताना मान आणि खांदा यात मोबाईल ठेवून गप्पा मारू नये.त्यामुळे मानेच्या नसांवर ताण येतो. मानदुखी सुरू होते.

कॉम्प्युटरवर काम करताना तुमच्या खांद्यांमध्ये आणि कॉम्प्युटरमध्ये 90 अंशाचे अंतर असावे.

आपली प्रतिक्रिया द्या