कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आरोपींना जामीन मंजूर, तपासात प्रगती न झाल्याने कोर्टाचा निर्णय

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तपासात प्रगती न झाल्याने कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची फेब्रुवारी 2015 साली गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 2018-19 दरम्यान सचिन अंदूळे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, भरत कुरणे, वासूदेव सुर्यवंशी यांना अटक झाली होती. तपासात प्रगती न झाल्याने आणि या खटल्याचा निकाल लवकर लागणार नसल्याने आरोपी जामिनासाठी पात्र होते. त्यामुळे आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आरोपी वीरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जाचा स्वातंत्र्याचा विशेष आढावा घेण्याचा निर्देश कोर्टाने दिले आहे.