मणिशंकर अय्यर यांची घरवापसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी ही अत्यंत नीच व्यक्ती आहे, असे वक्तव्य डिसेंबर 2017मध्ये गुजरात निवडणुकीदरम्यान एक संदर्भ देताना केल्या प्रकरणी मणिशंकर अय्यर यांना काँग्रेसमधून निलंबित केले होते. त्यांचे हे निलंबन आता पक्षाने मागे घेतले आहे. यामुळे त्यांची घरवापसी झाली आहे.

काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अनुशासन समितीच्या सल्ल्यानंतर अय्यर यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. तेव्हा अय्यर यांच्या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार टीका झाली होती. अय्यर यांनी आपल्याला उद्देशून वापरलेले शब्द म्हणजे गुजरातचा अपमान असल्याचे मोदींनी म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसने अय्यर यांच्यावर कारवाई करीत त्यांचे प्राथमिक सदस्यत्वच निलंबित केले होते.