
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच खलनायक ठरवणे योग्य नाही. त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक केले पाहिजे, अशी स्तुती करणे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. केरळ प्रदेश काँग्रेस समितीने मोदी यांची प्रशंसा केल्याप्रकरणी थरूर यांच्याकडून स्पष्टीrकरण मागितले आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनू संघवी यांनीही मोदींच्या चांगल्या कामाचे कौतुक करायला हवे, असे मत व्यक्त केले होते.
केरळमधील खासदार थरूर यांनी अलीकडेच मोदींच्या कामाची स्तुती करत सातत्याने पंतप्रधानांवर टीका करणे योग्य नसल्याचे म्हटले होते. या वक्तव्याची गंभीर दखल घेत केरळ काँग्रेस कमिटीने त्यांना नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण एवढय़ावरच न थांबता काँग्रेस हायकमांडकडे तक्रार करण्याचा निर्णय केरळ काँग्रेस अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी घेतला आहे.
























































