
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बँकांचे पैसे घेऊन पळालेल्या माल्याप्रकरणी काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. तसेच माल्याला पळवण्यात कुणाचा हात होता हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट करावे अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला म्हणाले की ‘भाजप बॅंक घोटाळा करणार्यांसोबत कावळा ऊड चिमणी ऊड खेळत आहे. कधी नीरव मोदी ऊड, कधी चोक्सी ऊड कधी माल्या ऊड हे भाजपकडून चालले आहे.”
On 19 Aug 2014, SBI issued a notice stating Vijay Mallya is willful defaulter. On Sept 2014, United Bank of India also stated same. By 2015, SFIO & CBI registered complaints against him. So how can CBI now say that they had no proof of his fraud?: RS Surjewala,Congress pic.twitter.com/CHRY9i78Wr
— ANI (@ANI) September 14, 2018
तसेच “आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते पीएल पुनिया यांनी संसदेत अर्थमंत्री जेटली आणि माल्यात संवाद झाल्याचे पाहिले. याप्रकरणी अर्थमंत्री आणि पंतप्रधान यांनी मौन पाळले म्हणजे यात ते दोषी आहेत.” असे सूरजेवाला म्हणाले.
LIVE: Press briefing by @rssurjewala, AICC Communications I/c and @JaiveerShergill, National Media Panelist. https://t.co/wsjBgAWrIc
— Congress Live (@INCIndiaLive) September 14, 2018
“जर पंतप्रधान मोदी यांनी कुठलीच कारवाई नाही केली तर ते चौकीदार नसून भागीदार आणि गुन्हेगार असल्याचे सिद्ध होईल” असे सूरजेवाला म्हणाले. तसेच जर पुढील वर्षी काँग्रेस सत्तेत आली तर माल्याला बेड्या ठोकून हिंदुस्थानात आणून असे स्पष्ट केले.
























































