
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेसने हरयाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दीपेंद्र हुड्डा यांचेही नाव असून पक्षाने त्यांना सलग चौथ्यांदा संधी दिली आहे. दीपेंद्र हुड्डा यांचे वडिल भुपेंद्र हुड्डाही चारवेळा खासदार राहिलेले आहेत. तर हरयाणातील सिरसामधून अशोक तंवर यांना पक्षाने संधी दिली आहे.
Congress Central Election Committee announces the next list of candidates for the ensuing elections to the Lok Sabha. pic.twitter.com/RXPrp68rNI
— Congress (@INCIndia) April 13, 2019
मध्य प्रदेशच्या ग्वालियर मतदारसंघातून पक्षाने अशोक सिंह यांना तिकीट दिली आहे. या जागेवरून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पत्नी प्रियदर्शनी शिंदेंना संधी देण्यात येईल अशी चर्चा होती. उत्तर प्रदेशच्या गोंडा मतदारसंघातून अपना दलच्या कृष्णा पटेल यांना संधी दिली आहे. कृष्णा पटेल यांच्या अपना दलने काँग्रेसही युती केली असून ते काँग्रेसच्याच निवडणूक चिन्हावर लढत आहेत. तर त्यांची मुलगी अनुप्रिया पटेलने भाजपशी युती केली आहे.



























































