राजीवलाही मिळाले होते पूर्ण बहुमत, पण दहशत पसरवली नाही! : सोनिया गांधी

932

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात उल्लेख न करता मोदी सरकारवर हल्ला चढवला. राजीव गांधी यांनाही पूर्ण बहुमत मिळाले होते, परंतु त्यांनी याचा वापर दहशत आणि भितीचे वातावरण बनवण्यासाठी केला नाही, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

1984 रोजी राजीव गांधी प्रचंड बहुमत घेऊन सत्तेत आले होते. परंतु त्यांनी याचा वापर भितीदायक वातावरण बनवण्यासाठी आणि लोकांना धमकावण्यासाठी केला नाही. संवैधानिक संस्थांचे संस्थांचे स्वातंत्र्य नष्ट करण्यासाठी आपल्या सत्तेचा वापर केला नाही, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

कायम आठवणीत
राजीव गांधी यांची आठवण आजही आमच्या ह्रदयात कायम आहे. हिंदुस्थानला मजबूत, सुरक्षित आणि स्वावलंबी बनवण्याचा त्यांचा निर्धार होता. पंतप्रधानपदाच्या थोड्या कालावधीत त्यांनी देशात एकता कायम रहावी यासाठी काम केल्याचे, सोनिया गांधी म्हणाल्या. 18 वर्षाच्या तरुणांना मतदानाचा अधिकार प्रदान करण्याचा निर्णयही त्यांचाच होता, याचा उल्लेखही सोनिया यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या