
भारतीय जनता पक्षाने 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पाशवी बहुमत मिळवले. यामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या विरोधी पक्षाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम सरसावले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपला पराभूत केले जाऊ शकते असे म्हणत विरोधी पक्षातील जोश निर्माण केला. यासाठी त्यांनी काही आकडेवारी देखील शेअर केली आहे.
भाजपला पराभूत केले जाऊ शकते असा विश्वास विरोधी पक्षात निर्माण व्हायला हवा. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने हे स्पष्ट होईल असा विश्वास चिदंबरम यांनी व्यक्त केला. यासाठी त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीची आणि पोटनिवडणुकीची आकडेवारी जारी केली. यात भाजपची लाट ओसरत असल्याचे दिसते.
चिदंबरम यांनी ट्विट करून ही आकडेवारी दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 381 विधानसभा मतदारसंघात निवडणूक झाली. यात 330 जागांवर थेट निवडणूक, तर 51 जागांवर पोट निवडणूक झाली. या 381 पैकी फक्त 163 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे.
विशेष म्हणजे 2019 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत या भागात भाजपने 381 पैकी 319 विधानसभा जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे कोण म्हणतं भाजपला पराभूत केले जाऊ शकत नाही, असे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे.
2019 के बाद से इन क्षेत्रों के चुनावों या उप-चुनावों में, भाजपा उम्मीदवारों ने 381 में से केवल 163 में ही जीत हासिल की।
किसने कहा कि भाजपा को हराया नहीं जा सकता है? विपक्षी दलों को यह विश्वास करना होगा कि वे भाजपा को हरा सकते हैं।
मुझे उम्मीद है कि यह बिहार में साबित होगा।— P. Chidambaram (@PChidambaram_IN) November 1, 2020


























































