ट्रॅक्टर घेऊन राहुल गांधी पोहोचले संसदेत, कृषी कायद्याचा केला विरोध

कृषी कायद्यांचा विरोध करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्रॅक्टर मार्च काढला. राहुल गांधी यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले. राहुल गांधी यांच्या सोबत काँग्रेस नेते आणि कार्यकर्तेही होते.

या वेळी राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही शेतकर्यांकचा संदेश संसदेत पोहोचवू. संसदेत या कायद्यांवर चर्चा नाही झाली, शेतकर्यांकवर अन्याय होत असून हा काळा कायदा आहे. हा कायदा मागे घेतलाच पाहिजे. हा कायदा शेतकर्यांहच्या हितासाठी नसून केवळ 2-3 बड्या उद्योजकांसाठी आहे असेही गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांचा ट्रॅक्टर संसद भवनाच्या एनेक्सी गेट जवळ थांबवण्यात आला. राहुल गांधी ट्रॅक्टर घेऊन संसद भवनात जाणार होते, परंतु पोलिसांनी त्यांना गेटवरच थांबवले. राहुल गांधींसोबत दीपेंद्र सिंह हुड्डा आणि प्रताप सिंह बाजवाही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या