मला पाकिस्तानात जायचंय, सिद्धूने मुख्यमंत्र्याकडे मागितली परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस पक्षाचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना पाकिस्तानला जाण्यासाठी पराराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह यांना पत्र लिहून परवानगी मागितली आहे. पाकिस्तानमध्ये करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची सिद्धू यांची इच्छा आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान 9 नोव्हेंबर रोजी करतारपूर कॉरिडरचे उद्घाटन करती. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खान यांनी सिद्धू यांना आमंत्रण पाठवले होते. या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी सिद्धू यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडून राजकीय परवानगीची गरज आहे.

सिद्धू यांना चार ते पाच दिवसात हिंदुस्थान सरकारकडून ही परवानगी घ्यावी लागणार आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि केंद्रिय मंत्री हरदीप पुरी यांच्यासह 575 जणांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान यांच्या शपथविधीवेळी नवज्योत सिंह सिद्धू पाकिस्तानला गेले होते. त्यांच्या पाकिस्तान दौर्‍यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता.