गॅस सिलिंडर उंचावत संसदेत पोहोचली काँग्रेसची महिला खासदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी महागाई, अग्निपथ व जीएसटीच्या मुद्दयावरून लोकसभा राज्यसभेत जबरदस्त हंगामा केला. बुधवारी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात होण्याआधी काँग्रेसने संसद भवनात आंदोलन केले. या आंदोलनत एक महिला खासदार चक्क सिलिंडर हातात उचलून संसदेत पोहोचली होती. या महिला खासदाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खडगे व अधीर रंजन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनाबाहेर आंदोलन करण्यात आले. महागाई, एलपीचे वाढते दर, जीएसटी या मुद्द्यांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.