दिल्लीत जशी जशी थंडी वाढेल तसा फुफ्फुसांवर…; शशी थरुर यांनी व्यक्त केली चिंता 

दिल्लीची हवा दिवसेंदिवस विषारी बनत असून आता इथल्या प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. वाढत्या प्रदुषणामुळे राजकारणही तापले आहे. आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस यावरून भाजपवर सातत्याने टीका करत आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरुर यांनी प्रदुषणावर चिंता व्यक्त करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. जशी जशी नोव्हेंबरमध्ये थंडी वाढत जाईल तसतसे फुफ्पुसांवर त्याचा परिणाम जाणवेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

शशी थरुर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी जशी जशी नोव्हेंबरमध्ये थंडी वाढत जाईल तसतसे फुफ्पुसांवर त्याचा परिणाम जाणवेल असे लिहीले आहे. सोबत त्यांनी प्रदुषणाच्या गुणवत्ता पातळीचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये 371 एक्युआय दाखवला जात आहे. त्यांनी सकाळी धुक्यात हरवलेली दिल्ली आणि हवेची खराब गुणवत्ता असताना ही पोस्ट केली आहे.