
केंद्र सरकारने मनमानीरीत्या मंजूर केलेली कृषी विधेयके, सरकारी संस्थांचे खासगीकरण, उत्तरप्रदेश मधील हाथरस येथे अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसच्या वतीने ‘मूक धरणे आंदोलन’ करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेस आमदार, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
केंद्र सरकारने काढलेला कृषी विधेयक कायदा हा या देशातील शेती व्यवसायाला मारक असून शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करणारा आहे. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गुंडाराज सरकार जबाबदार आहे, अशा शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर टीका केली.

























































