
भुलभुलैयांवर आता जनतेचा विश्वास राहिला नसल्याने लोकांना कामे करणारी माणसे हवी आहेत. राज्यात काँग्रेसची परिस्थिती पाहाता काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही. संगमनेर तालुक्यातून काँग्रेसचा उमेदवार निवडून देऊन उपयोग तरी काय, असा टोला गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांना लगावला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उद्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेस सोडण्याची वेळ येमार नाही ना असा खोचक सवालही त्यांनी मालुंजे येथे पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनाप्रसंगी केला.

























































