राहुल गांधी यांचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । तिरुअनंतपूरम 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत बहिण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी उपस्थीत होत्या. अर्ज भरल्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी  रोडशोमध्ये सहभागी झाले आहेत.

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड अशा दोन मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यापैकी वायनाड लोकसभा मतदार संघातून राहुल गांधी यांनी उमेदवारी उर्ज दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी दक्षिण हिंदुस्थानातून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. केरळ, तामिळनाडु तसेच कर्नाटकातूनही याबाबत मागणी होत होती. त्यामुळे अमेठीसोबतच वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे राहुल यांनी ठरवल्याचे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले होते.