मोदी सरडय़ाच्या रंगाप्रमाणे स्वत:चेच शब्द बदलताहेत! – प्रियांका गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले तीन महिने हिंदू-मुस्लिम चालवले होते. सगळा देश बघत होता आणि काल अचानक वाराणसीत म्हणाले, मी असं बोललोच नाही. मी जर असं बोललो तर पंतप्रधानपदासाठी लायकच नाही. मोदीजींचं हे काय चाललंय. ते आता काहीही बाष्कळ गोष्टी बोलायला लागले आहेत. सरडय़ाच्या रंगाप्रमाणे स्वतःचे शब्द बदलत आहेत असा टोला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदींना लगावला.

रायबरेलीतील एका सभेत त्यांनी राहुल गांधी यांचा प्रचार करताना मोदींनी स्वतःलाच नालायक ठरवले असल्याचे मोठय़ा खुबीने सांगितले. मोदींनी वाराणसीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर मात्र मुस्लिमविरोधी भूमिकेवरून अचानक पलटी मारली मात्र महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी पुन्हा तोच हिंदू-मुस्लिम मुद्दा मांडत प्रचाराला धार्मिक कलहाचा रंग दिला होता. या बोटावरचे त्या बोटावर करणाऱया मोदींच्या या खोटेपणावर प्रियंका गांधी तुटून पडल्या.