लाज वाटू द्या निर्लज्जांनो! शववाहिकांसोबत फोटो काढणाऱ्या नेत्यावर काँग्रेसची टीका

भाजप नेते आणि माजी महापौर आलोक शर्मा यांनी भोपाळ इथल्या रुग्णालयांना शववाहिन्या सुपूर्द केल्या. सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात शर्मा यांनी या गाड्यांसमोर उभे राहून फोटोही काढले होते. हे फोटो आणि कार्यक्रमाबाबतची माहिती त्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.

आलोक शर्मा यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की “सध्याचा काळ हा संकटाचा काळ आहे. या महामारीमध्ये आपण सगळ्यांनी कोणीना कोणी तरी जवळची व्यक्ती गमावली आहे. अनेकजण रुग्णालयात या महामारीशी सामना करत आहेत. प्रत्येकाला कोणाची तरी मदत गरजेची आहे. समाजातील अनेक संघटना मदतीसाठी पुढे येत आहेत. मी सगळ्यांना आवाहन करतो तुम्हाला शक्य होईल ती मदत लोकांना करा. . मजबूर, लाचार व्यक्ती रिक्षा, ट्रॅक्टर, ट्रॉली जे वाहन मिळेल त्यात आपल्या आप्तेष्टांचे शव वाहून नेत असल्याची आपण सगळ्यांनी भयावह दृश्ये पाहिली आहेत. ही अडचण लक्षात घेऊन आम्ही 6 शववाहिन्या रुग्णालयांना दान केल्या आहेत. या शववाहिन्या निशुल्क असतील”

मित्रों यह संकट की घड़ी है इस महामारी में हम सब ने अपने किसी न किसी आत्मीय जन को खोया है कई लोग अस्पतालों में कोरोना…

Posted by Alok Sharma on Monday, April 19, 2021

शववाहिन्यांच्या वितरण कार्यक्रमावेळी शर्मा यांनी ही वाहने एकमागोमाग उभी केली आणि त्यासमोर उभे राहात फोटो काढले होते.या फोटोंमुळे काँग्रेस नेत्यांनी शर्मा यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे मध्य प्रदेशातील प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी ट्विटरचा आधार घेत शर्मा यांच्यासह भाजपवर टीका केली आहे. ‘लाज वाटू द्या, निर्लज्जांनो’ असं म्हणत सलुजा यांनी शर्मा यांच्यावर टीका केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या