
यंदाच्या शैक्षणिक वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने आयडॉलच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश शुल्कात 20 ते 35 टक्क्यांची सूट दिली आहे. यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश शुल्कात आयडॉलने कमीत कमी 860 व जास्तीत जास्त 4520 रुपयांपर्यंत सवलत दिली आहे. प्रवेश शुल्कात सवलत दिल्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाने आयडॉलच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची मुदतही वाढविली असून विद्यार्थ्यांना आता 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. जुलै सत्रासाठी ही अंतिम मुदतवाढ असून विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आहे.






























































