बांधकाम क्षेत्राला भरारीसाठी हवीय सरकारची साथ! बीआयचे माजी अध्यक्ष अजित गुलाबचंद यांचे प्रतिपादन

लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसायातील प्रकल्प मोठय़ा प्रमाणाकर प्रभावित झाल्याने पहिल्यांदाच मजूर स्थलांतरित झाले. बांधकाम व्यवसायापुढे सध्या अस्तित्वाच्या लढाईचा प्रश्न आहे. पण बांधकामाचा दर्जा, स्पर्धात्मक खर्च, केळेत प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी या गोष्टींबरोबर सरकारने या व्यवसायाला पाठबळ दिले तर हे क्षेत्र यशाची एक वेगळी पातळी गाठू शकेल, असे उद्गार ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे माजी अध्यक्ष आणि हिंदुस्तान कंस्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी काढले.

‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने आयोजित केलेल्या ‘देशातील बांधकाम व्यवसायाची वस्तुस्थिती – सध्यास्थिती आणि भवितव्य’ या विषयावर केबिनारच्या माध्यमातून बोलत होते. या केबिनारला बीएआयचे अध्यक्ष मु. मोहन, सचिक प्रदीप नागवेकर आणि 400 हूनही व्यावसायिक सहभागी झाले होते. गुलाबचंद पुढे म्हणाले, ‘बँकांनी पायाभूत सुविधा, बांधकाम व्यवसाय आणि गृहनिर्माण क्षेत्र या क्षेत्रांना अ-कार्यकारी क्षेत्र घोषित केल्याने या क्षेत्रांना मोठय़ा प्रमाणावर भांडवलाची कमतरता भासतेय. त्याचा परिणाम म्हणून अनेक प्रकल्पांच्या किंमती वाढत आहेत. नवीन प्रकल्पांची घोषणा थांबली आहे. देशात सर्वच क्षेत्रात नोकरकपात होतेय. त्यामुळे वैयक्तिक पातळीवरसुद्धा आपण मोठय़ा समस्यांना सामोरे जात आहोत.’

आपली प्रतिक्रिया द्या