दादरमध्ये गुरुवारपासून ग्राहक पेठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर दादर येथे शिवाजी पार्कमध्ये 31 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेते, दिग्दर्शक भरत दाभोळकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. पेठ स्काऊट गाईड हॉल, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित ग्राहक पेठ करण्यात आली आहे. या ग्राहक पेठेत पैठणीची गुढी, तोरणे, हॅंडीक्राफ्ट, लायटिंग, लाकडी वस्तू खरेदी करता येणार आहेत. गेली 32 वर्षे सदर उपक्रम सातत्याने सुरू आहे. तरी सर्व ग्राहकांनी गुढीपाडव्याच्या खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजिका मीनल मोहाडीकर यांनी केले आहे.